Wednesday 17 October 2012

चेंडा - उच्च नादाचा धनी

              इसापनीतीच्या गोष्टी, पंचतंत्र आणि राम आणि शाम ह्या सारख्या गोष्टी आपण सर्वांनीच एकल्या असतीलच. तशीच काहीसी ह्या दोन वाद्यरुपी भावंडांची ही गोष्ट वजा माहिती आहे. होय ! एकाचे चेंडा तर दुस-याचे चेंडी आहे. ही भानगड काय आहे? ही काह्रोखारच वाद्याचीच नावे आहेत. ही दोघीही वाद्ये हिंदू संस्कृतीत महत्वाची मानली जातात. केरळ मध्ये तर या वाद्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. भारतातातील इतर भागातही यांचा पूर्वापार इतिहास आढळतो. ह्या दोघाही वाद्यांची आपण दोन भागात माहिती घेऊया.

              सुरुवातीला मोठा भाऊ असलेल्या चेंडा या ताल वाद्याबद्दल जाणून घेऊ. हे पारंपारिक आणि संस्कृतीदर्शक वाद्य म्हणून केरळ, कर्नाटक प्रसिद्ध आहे. हे प्रामुख्याने सण, मंदिरातील महोत्सव, विशेष आनंदी प्रसंग आणि धार्मिक कार्यात वाजविले जाते. काही ठिकाणी या वाद्य संगीतावर चेंडा कथक्कली, थेय्यम, कुडीयाट्टम कन्यार ह्या विविध नृत्यप्रकार प्रस्तुत केले जातात. कर्नाटक मधील कुलू नाडू या गावी या वाद्याच्या तालावर  यक्षगान नामक नृत्य नाटक प्रसिद्ध आहे. या वाद्याची दुसरी बाजू अशी आहे की त्याला असुर वाद्य संबोधतात. परंतु हे वाद्य पारंपारिक आणि महत्वाचे वाद्य आहे. केरळ, कर्नाटक आणि इतर दक्षिण राज्यात वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यात या वाद्याला आजही मनाचे स्थान दिसून येते.
              
                या वाद्याला प्राचीन परंपरा लाभली आहे. यामध्ये विविध प्रकार आहेत त्यात
उरुत्तू चेंडा हा पारंपारिक खेळांसाठी वाजविला जातो, विक्कू चेंडा हा सांस्कृतिक कार्यक्रमात वाजविला जातो तर अच्छान चेंडा हा प्रकार इतर कार्यक्रमात वाजवितात. ह्या वाद्याला वाजविण्यासाठी त्याचे वजन पेलण्याची अगोदर तयारी असावी लागते. विशेषकरून चांगली शरीरयष्टी असलेले आणि ताल समजणारे वादक याला वाजवितात. हे वाद्य वेगवेगळ्या स्वर वाद्यांसोबत वाजविण्याची प्रथा दक्षिण राज्यात आहे.

               याला वाजविण्यासाठी दोन काडींचा उपयोग करतात. याचा वरील भाग हा ढोलसारखा दुमडून सोबत चामडे घट्ट बांधतात. याला वाजविण्याचे विविध प्रकार आहेत त्यात एक वर पहिला तो काडीच्या सहाय्याने तर दुसरा हा एक गोलाकार (लाटण्याच्या आकारासारखी) काडीच्या सहाय्याने वाजविण्याचा आहे. याची लांबी साधारणतः २ फुट असते. या वाद्याला आवरण हे पशूंच्या चामड्याने करतात. हे वाद्य आपल्या उंच (उच्च) आणि कणखर नादासाठी प्रसिद्ध आहे.
              
              चेंडा हे नाव जरी ऐकण्यास विचित्र वाटत असले तरी हे नाव इंग्रज गुलाबापासून निर्मिले गेले असल्याची आख्यायिका आहे. त्यात इंग्रजी गुलाब म्हणजे रीचेंडा, याचाच दुसरा अर्थ मजबूत राजनेता होय. म्हणून ह्या उच्च नाद आणि ताल निर्माण करणा-या ताल वाद्याला चेंडा हे नाव पडले आहे. असो ही तर झाली मोठ्या भावाची माहिती आता पुढील भागात पाहूया छोट्या भावाची म्हणजेच चांडे या ताल वाद्याबाद्दलची इत्यंभूत माहिती.

References :- 
http://en.wikipedia.org/wiki/Chenda 
http://chandrakantha.com/articles/indian_music/chenda.html





No comments:

Post a Comment