Wednesday 17 October 2012

सुरांचा जादुगार : घाटम

             संगीत आणि बोटांचे नाते हे अतूट आणि मैत्रीपूर्ण असते कारण संगीत वाद्य वाजविण्यासाठी हातचे बोटे महत्वाची भूमिका तर बजावितात पण त्याचबरोबर मधुर स्वर निर्माण करून मनस्वी आनंदही देतात. अश्याच आनंदाची निर्मिती करणा-या ताल वाद्याची आत्ता आपण माहिती घेणार आहोत. घाटम हे ताल वाद्य प्रकारात येते. संगीतातील काही जुन्या आणि मोजक्या संग्रही वाद्यांपैकी एक असे हे ताल वाद्य सध्या दिसेनासे झाले आहे. तसे याचा आकार हा मटक्यासारखा असतो. परंतु त्याची बनावट ही फारच काळजीपूर्वक केलेली असते. त्याला बनविण्यासाठी चिकणमाती, लोखंडाचा चुरा किंवा अन्य धातूंचा चुरा यांचा वापर केला जातो. 
          
                हे ताल वाद्य वाजविण्यासाठी त्याला अगोदर दोन्ही पायांच्या मध्यभागी घेऊन बसावे लागते. त्यानंतर त्यावर आपल्या दोन्ही हातांच्या बोटांनी बास (संगीताची एक टोन) निर्माण करतात.
यात घाटम च्या तोंडाच्या हात ठेऊन बास टोन कमी जास्त प्रकारचे संगीत निर्माण करता येते. याला घुमकी असेही म्हणतात.

            या वाद्याचा उल्लेख पार रामायणापासून ग्रंथांमध्ये आहे. पंजाब, काश्मीर, दक्षिण भारत, कर्नाटक अश्या वेगवेगळ्या संस्कृती असलेल्या राज्यांमध्ये याची संगीत प्रचीती अजूनही जाणवते ती काही मोजक्या सुगम संगीत कार्यक्रमांत. विशेषतः कर्नाटक संगीतात याच्या सोबतीला मृदंगम वापरून जुगलबंदी करतात. प्रसिद्ध वादक वैद्यनाथन सुरेश यांच्यानुसार याचा चांगला उल्लेख हा दक्षिण संगीताच्या इतिहासात वर्णित आहे.

             या ताल वाद्याच्या इतिहासात डोकावले तर भरपूर माहिती मिळेल. जसे ह्या वाद्याची बनावट हि दोन प्रकाराने होते. जरी हे दिसायला घरगुती मटक्याप्रमाणे असले तरी ते एक वाद्य आहे हे विसरता कामा नये.  जे वेगवेगळे आणि टोन असलेले स्वर, संगीत निर्माण करते. मद्रास आणि मनमदुराई हे दोन प्रकार असून मद्रास घाटम हे वजनाने हलके आणि कमी टोन च्या संगीत निर्मितीसाठी वापरतात. तर मनमदुराई घाटम हे वजनाने जड आणि उच्च टोनच्या निर्मितीसाठी वापरले जाते. काही वादकांच्या मते ह्या प्रकारचे घाटम वाजवायला कठीण पण एक सुरेल नाद निर्माण करते.

             घाटम हे नाव संस्कृत मधील असून या वाद्याला राज्यानुसार वेगवेगळे नाव दिले गेले आहे. पंजाब मध्ये घारहा, कर्नाटक संगीतात ताल वाद्य, राजस्थान मध्ये पानी मदगा, तेलगु मध्ये घटम, कन्नड संगीतात घट तर तमिळ मध्ये काटम म्हटले जाते. नावातही संगीत स्वराप्रमाणे विविधता ह्या वाद्याचे वेगळेपण अधोरेखित करते. हरिहर विनायकम, सुरेश घाटम, हरिहर सुरेश चंद्रन, के. मुरली, भूसुरापल्ली वेन्केटेस्वरलू, घाटम कार्तिक, मन्नाई कन्नन यासम प्रसिद्ध वादक आपल्या हिंदुस्तान संगीतात ह्या वाद्याचे आहेत.

 

References :-
http://en.wikipedia.org/wiki/ghatam
http://www.tarang-classical-indian-music.com/indian_musical_instruments/ghatam.

No comments:

Post a Comment