Wednesday 17 October 2012

कहे समय का एकतारा अक्षर-अक्षर दीप चले

कहे समय का एकतारा अक्षर-अक्षर दीप चले 

कहे समय का एकतारा अक्षर-अक्षर दीप चले  या सर्व शिक्षा अभियानाच्या गीतामधील एकतारा म्हणजे आपली संगीतातील एकतारी होय. हि आठवण केवळ यासाठी कि त्याचीच माहिती या भागात आम्ही देणार आहोत. कीर्तनातील एक अविभाज्य अंग म्हणून एकतारी चा वापर संत-महात्मे आणि फकीर(पुर्वीचे) करीत असत. वारकरींच्या बद्दल सानागायचे झाले तर कपाळी बुक्का किंवा चंदनाचा टिळा, हातात झांजा किंवा एकतारी, गळयात तुळशीच्या माळा, मुखी विठ्ठलाचे नाम, ज्ञानेश्वरांच्या ओव्या किंवा तुकारामांचे अभंग या उक्तीप्रमाणे त्यांचे वर्णन करता येईल. उद्देश एवढाच की एकतारी हे वाद्य पार पूर्वीपासूनचे आहे. ते विसरून कसे चालणार ? त्याबद्दलची माहिती करून घ्यायला नक्कीच आवडेल ना आपल्याला.

         एकतारी हे तंतुवाद्य प्रकारातील वाद्य आहे. त्याचा उपयोग हा भजन, सुगम संगीतात केला जातो. यात एकाच तार लावून त्याला त्या काडीच्या वरील बाजूस कसून बांधतात. ज्यातूनच आपण वाजवून स्वर निर्माण करतो. याला वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे नाव आहे. पंजाब मध्ये इकतारा, उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगाल मध्ये एकतारा तसेच महाराष्ट्रात एकतारी. याने निर्माण होणाऱ्या सात स्वराने संतांनी वारक-याच्या मनावर अधिराज्य गाजविले. पण आत्ताच्या रेडीमेड संगीत जमान्यात ही एकतारी नामशेष झाली आहे. ती केवळ वासुदेव, वारकरी, संत (पण जुन्या विचाराचे) यांकडेच पाहायला मिळते नाहीतर एखाद्या संगीत वस्तू संग्रहालयात.

         असो, ही एकतारी संत गाडगेबाबांच्या हातात होती तेव्हा त्यांनी समाजाला तन-मन स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. हीच एकतारी जेव्हा संत तुकारामांच्या हाती आली तेव्हा त्यांनी विठू भक्तीने अभंगवाणी ची निर्मिती केली आणि जनजागृती केली. हीच एकतारी जेव्हा पंजाबी संतांच्या हातात होती तेव्हा त्यांनीदेखील हिचा समाज जागृतीसाठी वापर केला. ते म्हणत की, "इकतारा बोले" आणि पुढे आपल्याला द्यायचा संदेश देत असत. सतयुगात संत मीराबाई याच्या हाती असलेले वाद्य म्हणजे एकतारीच ! इतिहासाची आणि संकृतीची देणगी असलेली एकतारी सध्या लुप्त झाली आहे. ही खंत वर संतांना देखील वाटत असेल.

        एकतारी ही भोपळ्याच्या खवक्यापासून किंवा लाकडापासून किंवा नारळाच्या वाटी पासून बनवतात. त्यानुसार त्याला नावही दिले जाते. यासोबत एक ३ फुटापर्यंत लांब अशी बांबूच्या काडीशी तिला जोडले जाते. त्यावर एकच तार गुंडाळून वाटीच्या विरुद्ध बाजूस घट्ट बांधले जाते. यातूनच एकतारीची निर्मिती होते. त्याला संत लोक हे आपल्या डाव्या हातात घेऊन वाजवितात. एकतारी हे अजूनही काही प्रमाणात पाहायला आणि ऐकायला मिळते ते कीर्तनाच्या, सुगम संगीताच्या कार्यक्रमातच.

------------------------------
------------------------------------------------
Sources and references :-
http://www.keshav-music.com/strings.php
http://en.wikipedia.org/wiki/Ektara (for image)
http://www.worldmusicalinstruments.com/c-49-ektara.aspx

No comments:

Post a Comment