Wednesday 17 October 2012

हृदयाचा चोर : दिलरुबा

वंदे मातरम गाणे आपण टी.व्ही. वर अनेकदा पाहतो पण त्यातील ए. आर. रेहमान एका मोठ्या वाद्याने हे देशभक्ती जागविणारे सूर काढतो, त्या वाद्याबद्दल आपल्याला आज माहिती घ्यायची आहे. नावातच ज्याच्या "दिल" हा प्रेमाचा अर्थ आहे. हे नाव ऐकून अगोदर तुम्हाला वेगळे वाटले असेल, पण हे वाद्य प्राचीन काळापासून भारतात अस्तिवात (वापरात) आहे. याचा उल्लेख भारतीय इतिहासात आढळतो.  या वाद्याला इसराज हे हिंदी नाव आहे. भारताच्या उत्तर, मध्य आणि पूर्व क्षेत्रात दिलरुबा आढळते. काळानुसार संगीतातही बदल झाले म्हणून ह्यासारखे वाद्य काळाआड गेलेत. त्यातलेच दिलरुबा हे तंतुवाद्य होय.

२०० वर्ष पूर्वीचे हे वाद्य आजकाल दिसेनासे झाले आहे. ते जास्तकरून पंजाब, बंगाल आणि त्रिपुरा भागात धार्मिक संगीत कार्यक्रमात पहावयास मिळते. या वाद्याचे प्रमुख विशेष असे की यात १८ तार असतात, अक्कर हा धनुष्यासारखा असतो. पण सर्व खेळ हा एका तारेवर केला जातो हे विशेष. बाकी तारांचा उपयोग सुरानुसार केला जातो. सितार आणि दिलरुबा हे जवळजवळ सारखे वाद्य आहे. परंतु सितार हे वाजवायला सोपे आणि हलके असून दिलरुबा कठीण आणि जड आहे. याला वाजविण्याची कला सहजासहजी प्राप्त होत नाही. पूर्वी राजांच्या काळात हे वाद्य वाजवायला विशेष तज्ज्ञ संगीतकार असत. कारण याला वाजविण्यासाठी मधल्या आणि कधी कधी अगोदरच्या बोटाचा वापर करावा लागतो.  म्हणूनच तांत्रिकदृष्ट्या सितारपेक्षा हे वाद्य शिकण्यास, वाजविण्यास कठीण आहे.

हे वाद्य वाजविण्यासाठी ते गुडघ्यांच्या मध्यभागी घेऊन त्याला डाव्या बाजूस खांद्यावर टेकवून वाजवितात. यामध्ये  बोटांची हालचाल महत्वाची भूमिका बजावते. बोटांवर त्यातून निघणारे स्वर अवलंबून असतात. धार्मिक तसेच शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात याची जुगलबंदी होते.

याचा वापर साधन म्हणून केला जातो. रवींद्र संगीत गायन प्रकारात हे साधन म्हणून उपयुक्त आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, विष्णुपुर संगीत पर्व तसेच १९७०-८० च्या दशकाच्या आधी या वाड्याची लोकप्रियता भरपूर होती परंतु यानंतर ती हळूहळू कमी होऊ लागली होती. पण जुने ते सोने या उक्तीप्रमाणे प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी या वाद्याचा वापर त्यांच्या दिल से या चित्रपटात तर वंदे मातरम या देशभक्तीपर अल्बममध्ये केला आहे. याचबरोबर
प्रसिद्ध प्रतिपादक पंडित रणधीर रे, बुद्धदेव दास यांनी शांति निकेतन संगीत विद्यालयात केला आहे. अगदी आत्ताचे दत्तात्रेय घोष, आध्यात्मिक गुरु श्री चिन्मय यांनीही ध्य्यान साधनेसाठी त्याचा वापर केलेला आढळतो. भारतीय भौतिक वैज्ञानिक आणि गणितज्ञ एस.एन. बोस यांनाही हे वाद्य शिकण्याचा मोह आवरला गेला नाही. असे हे वाद्य नावाप्रमाणे प्रेमाचा ठाव घेणारे आहे. त्याला "दिल का चोर" असेही संबोधतात.

No comments:

Post a Comment