Wednesday 17 October 2012

बाणम

बाणम
नाव ऐकल्यानंतर डोक्यात आले असेल की या नावाचे कुठे वाद्य असेल का ?  मलासुद्धा हाच प्रश्न पडला होता पण होय ह्या नावाचे प्राचीन वाद्य हिंदुस्तान संगीतात होऊन गेले आहे. त्याचाबाद्दल्च माहिती घेऊ या.

           बाणम हे वाद्य पूर्वोत्तर भारत आणि बांगलादेश च्या संथाल लोकांचे पारंपारिक वाद्य होते असे म्हणतात. ते वाद्य त्यांच्यासाठी सण धुमधडाक्याने साजरा करण्याचे एक माध्यम होते.
बाणमच्या इतिहासात पाहिले  तर लक्षात येईल की, त्याचे वर्गीकरण हे बाणम तेंदर, धोद्रो बाणम, हुक बाणम अश्या अनेक जातीमध्ये होते. खरे पहिले तर यामुळे त्याचा बनावटवर काहीही परिणाम होत नाही. उलट तो त्याच्या संगीत मधुरतेने अधिक प्रचलित आणि प्रसिद्ध झालेला होता असे इतिहासात आढळते.
         

         बाणम हे वाद्य म्हणजे संथाल लोकांसाठी एक पर्वणीच होते.
एका दंतकथेनुसार सात भाऊ आपल्या बहिणीला मारून टाकण्याचा कट रचतात, परंतु एक भाऊ तो ते मांस न खाता एका मुंग्याच्या वारुळात टाकून निघून जातो पण काही दिवसांनी तेथे आल्यावर पाहतो तर त्या ठिकाणी एक सुंदर झाड आले असते. तो जवळ जाऊन ते पाहत असतांना त्या झाडातून त्याला एक सुमधुर ध्वनी ऐकायला येतो. यावर तो त्या झाडाची एक फांदी कापून ह्या बाणम वाद्याची निर्मिती करतो. अशी ही गोष्ट आहे. ही जरी गोष्ट असली तरी संथाल लोकांच्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य अंग म्हणून बाणम हे वाद्य आहे. हे वाद्य त्या लोकांच्या रोजच्या जीवनाचा भाग आहे. त्या लोकांच्या प्रत्येक सुख-धुकांच्या प्रसंगी हे वाद्य वाजविले जाते. याचबरोबर ज्यावेळेस संथाल लोक पाऊसात शेतीच्या कामाला सुरुवात करतात त्यावेळेस हे वाद्य ते वाजवितात. जेणेकरून येणारी पिके ही निरोगी आणि भरपूर प्रमाणात येतील.

            या वाद्याच्या प्रकारांबाबत विस्तृत माहिती घेऊ या. याचे पूर्ण नाव हे धोद्रो बाणम याचा शब्दशः अर्थ "पोकळ" साधन. या वाद्यास सरिंदा वाद्य परिवारात समाविष्ट करतात. बाणम हे वीणाचा एक प्रकार आहे. त्याला वाजविण्यासाठी एका धनुष सम काडीचा वापर होतो. तसेच त्याला वाजविण्याची स्थिती हे वायोलिन वाजविण्यासारखी असावी लागते. हे वाद्य इतिहास काळापासून वापरात असून भारत, इराण, पाकिस्तान, नेपाल आणि मध्य आशिया या देशात आढळते. संगीताच्या दृष्टीने पहिले तर हे वाद्य वाजविण्यास सोपे आहे. यात एक तार असून त्याला एका काडीच्या सहाय्याने संगीतकार वाजवितात. बाणम वाद्याचा आकार 18 x 15.9 इंच सामान्यतः आहे.

            या वाद्याची ओळख ही आजही संथाली लोकांच्या वेगवेगळ्या चित्रकृतीत दिसते. हे लोक म्हणतात या वाद्यांच्या सहाय्याने अलौकिक शक्तींशी गोष्ट करता येते. हे वाद्य संथाल लोकांच्या सण, उत्सव आणि पाऊस, शेतीच्या कामात जसे पेरणी, कापणी नांगरणी च्यावेळेस वाजविले जाते. पूर्वांचल भागात विविध संगीत कार्यक्रमात याचा वापर आजही  केला जातो. या वाद्याद्वारे आम्हाला प्रेरणा मिळते आणि आमचे काम पूर्ण होते असेही संथाल लोक मानतात.

References :-
http://chandrakantha.com/articles/indian_music/banam.html
http://www.metmuseum.org/collections/search-the-collections/180015354
http://www.123rf.com/photo_11511520_sarangi-dhodro-banam-lute-old-music-instrument-in-a-museum-madhy

No comments:

Post a Comment