Wednesday 17 October 2012

चांडे : वाद्य लहान पण नाद महान

               नावातच वेगळेपण असलेल्या ह्या ताल वाद्याचा मोठ्या भावाची आपण अगोदरच माहिती घेतली आहे. आता याची विस्तृत माहिती घेऊया. चांडे हे ताल वाद्य असून चेंडा प्रमाणेच ते देखील दक्षिण राज्यात लोकप्रिय आणि पारंपारिक वाद्य म्हणून प्रसिद्ध आहे. विशेष करून केरळ, कर्नाटक या राज्यात या वाद्याला मानाचा दर्जा आहे. या वाद्याचा इतिहास पाहता नेपाल मध्ये या वाद्याचा उगम झालेला आढळतो. त्याचप्रमाणे कर्नाटक आणि केरळ या भारतातील राज्यातही या वाद्याची प्रचीती आहे.

                चांडे हे ताल वाद्य दक्षिण भारतात सण, सांस्कृतिक कार्यक्रमात आणि यक्षगान या नृत्य नाट्यात ही वाजविले जाते. याला वाजविण्यासाठी डाव्या हाताचा वापर होतो. तो एक काडीने वाजविणारा ड्रम प्रमाणे होय. काहीवेळेस सुगम संगीत कार्यक्रमात सादर होत असलेल्या नृत्य नाटकात या वाद्याला मागणी असते. त्याला सोबतीला त्याचा मोठा भाऊ म्हणजे चेंडा असतोच. यक्षगान ताल प्रकारात याचा वापर दोन वाद्याच्या भागात केला जातो. त्यात पहिला म्हणजे बडगु थित्तू चांडे (उत्तर वाद्य) आणि दुसरा हा ठेंकू थित्तू चांडे (दक्षिण वाद्य) होय.
               
               चांडे वाद्याचा इतिहास पहिला तर प्राचीन हिंदू आणि पौराणिक कथांमध्ये त्याचा वापर हा युद्ध घोषित करण्यासाठी केला जात असे. कारण याच्या कडक आणि कणखर नादामुळे त्याचा आवाज हा जवळजवळ ३ किमी पर्यंत ऐकला जाई म्हणून युद्ध घोषित करण्यासाठी या ताल वाद्य रुपी ड्रम चा वापर होत असे.  याची बनावट कटहल (हिंदी शब्द) या झाडाच्या लाकडापासून केली जाते. यावर प्राण्याची चामडे लावून त्याला जाड दोरीने घट्ट बांधून वाजविण्यासाठी तयार केले जायचे. याला वाजविण्यासाठी काडी ही पोकळ असावी लागते. जेणेकरून आवाज हा चांगला निर्माण होईल.

              या वाद्याची राज्याप्रमाणे नावेही बदलत गेली. त्याला कन्नड मध्ये चांडे कोलू म्हणतात. याला वाजविणारा वादक हा सक्षम असणे गरजेचे असते कारण याला वाजवितांना जोरात वाजवावे लागते. याला तेथील लोक हे एका खेळाप्रमाणे समजून वाजवितात. या वाद्याने निर्माण होणारा ध्वनी हा दूर दूर पर्यंत जातो. या दोन्हीही वाद्याची महती प्राचीन काळापासून केरळ आणि कर्नाटक राज्यातील लोक संस्कृतीत तसेच हिंदुस्तान संगीतात सुद्धा आहे.
            हळूहळू लोप होणा-या या वाद्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, ज्याने हिंदुस्तानी संगीत हे जगातील कुठल्याही कोप-यात ओळखले जाईल. बस एवढीच अपेक्षा होती या लुप्त वाद्यांची माहिती देण्यामागे.

धन्यवाद !






2 comments:

  1. नमस्कार गोपाल जी . तुमचा हा ब्लॉग खूपच माहितीपूर्ण आहे . प्रत्येक वाद्याविषयी लिहिलेला लेख त्या वाड्याची अतिशय सखोल माहिती देतो . आमच्या रसिक रंजन या फेसबुक पेज वर दर दिवशी एका वाद्याची माहिती देण्यासाठी तुमच्या ब्लोग ची लिंक देत आहे . तेथून आमचे रसिक या वाद्यांविषयी हि तुमच्या ब्लोग मार्फत माहिती मिळवू शकतील.पेज मध्ये फक्त तुमच्या वाद्याविशायीच्या लेखाचे नाव आणि लेखाची लिंक असेल . लेख पाहण्यासाठी सर्वांना तुमच्या ब्लॉग वरच यावे लागेल . पेज ची लिंक :https://www.facebook.com/pages/Rasikranjan/162989530492622

    व माझा इमेल पत्ता :onkar.kulkarni@outlook.com

    ReplyDelete