Wednesday 17 October 2012

मुरचुंग

मधुर स्वरांच्या जुडती धारा....... हे गीत आठवते का?, बरं जाऊ द्या जेठालाल आणि दया भाभी? आत्ता हे तर आठवायलाच पाहिजे. सांगणे यासाठी की मुरचुंग ह्या ताल वाद्याची आपण माहिती घेणार आहोत. ते वाद्य यात दाखविण्यात आले होते. प्रेमात बहर हा जसा फुलांमुळे येतो त्यासम सुगम संगीतात या मुरचुंग वाद्यामुळे एकप्रकारचा बहरच येतो. सध्या हे वाद्य केवळ संग्रहालय किंवा संगीतकार (जुने) यांकडेच पाहायला मिळते. ह्या वाद्याची अनेक वैशिठ्ये आहेत. याचा इतिहासही तगडा आहे. आपण एक-एक माहिती घेऊया.
           मुरचुंग हे तालवाद्य असून त्याचा कर्नाटकी संगीतात मुख्यतः वापर होतो.  याचा आकार हा घोड्याच्या नाळ सारखा असून त्यात एक धातूची रिंग मध्यभागी टाकली असते आणि दुस-या बाजूला काटे सारखे टोक असते. याला तोंडात जिभेवर ठेऊन वाजवितात. या तालवाद्याचा संपूर्ण स्वरांचा खेळ हा त्यात असलेल्या  ट्रीगरवर असतो. यासाठी वाजविणा-याचे  दात आणि हाथ त्या वाद्यावर पूर्णपणे घट्ट बसलेले पाहिजे. यात मध्ये असलेल्या काटा रुपी धातूच्या तारेने विविध प्रकारचे स्वर बाहेर पडतात. या वाद्याला डाव्या हाताने धरून आणि एक बाजू दातांच्या मध्ये घेऊन वाजविण्याचे कसब हे खरोखरच वाखाणण्याजोगे असते. 
          याला वाजविणारे कलाकार पूर्वी फार कमी असायचे. या वाद्यासोबत घटम, मृदंगम याचा सुगम संगीतात वापर केला जाई. आपल्या श्वासाच्या सोबत या वाद्याचा स्वर निर्माण करणे म्हणजे एक अशक्यप्राय गोष्टच. तरीही पूर्वी राजदरबारात आणि जत्रेत ह्या वाद्याला वाजविण्या-यांची फार मागणी असायची.
           मुरचुंग हे ताल वाद्य बांगलादेश, नेपाल येथेही प्रचलित असून ते आजही तेथे वाजविले जाते. काही प्रमाणात ते भारतातही दक्षिणेत आजही वाजवितात. यासोबत घटम हे ताल वाद्य सुद्धा वाजवितात.
या ताल वाद्याची प्रसिद्धी पाहिजे तेवढ्या झाली नाही. पूर्वी सण, मीना बाजार म्हणजे जत्रेत ही वाद्य वाजविणारे दिसत. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात ह्या संगीताचे कोणालाही सोयरेसुतक नाही असेच म्हणावेसे वाटते. कलाकार हा आपल्या कलेने या वाद्यातून  ध्वनी म्हणजेच संगीत उत्पन्न करून समोरच्याचे मनोरंजन करतो.



source :- http://chandrakantha.com/articles/indian_music/murchang.html

No comments:

Post a Comment